श्री भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम
श्रीमद्राजाधिराज योगिमहाराज
त्रिभुवनानन्द अद्वैत अभेद
निरञ्जन निर्गुण निरालम्ब
परिपूर्ण सदोदित सकलमतस्थापित
श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराज की जय॥ ॥
भक्तकार्यकल्पद्रुम
श्रीप्रभु हा सद्भक्तांच्या ऐहिक व पारलौकिक कामना पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहे.
गुरुसार्वभौम
श्रीप्रभु हा समस्त जगताला मार्गदर्शन करणारा गुरु आहे.
श्रीमद्राजाधिराज
श्रीप्रभु हा समस्त ऐश्वर्याचा स्वामी व सम्राटांचा सम्राट आहे.
योगिमहाराज
श्रीप्रभु हा योगियांचा राजा आहे.
त्रिभुवनानन्द
श्रीप्रभु हा जाग्रति, स्वप्न, सुषुप्ति या तीन्हीं अवस्थांना प्रकाशित करणारा असून आनंदरूप आहे.
अद्वैत
श्रीप्रभु हा एकरूप असून त्याच्या ठिकाणीं सर्व प्रकारच्या द्वैताचा अभाव आहे.
अभेद
श्रीप्रभु हा भेदरहित असून सर्वांप्रति समान दृष्टि ठेवणारा आहे.
निरंजन
श्रीप्रभु हा सर्व प्रकारच्या दोषांपासून अलिप्त आहे.
निर्गुण
श्रीप्रभु हा सत्त्व, रज, तमादि तीन्हीं गुणांच्या पलीकडचा आहे.
निरालंब
श्रीप्रभूस कुणाच्याही आधाराची आवश्यकता नाही; तोच सर्वांचा आधार आहे.
परिपूर्ण
श्रीप्रभूंमध्ये कसलीही न्यूनता नाहीं; तोच सर्व प्रकारची न्यूनता पूर्ण करणारा आहे.
सदोदित
श्रीप्रभु हा सदैव प्रकाशमान आहे, त्याचा केव्हांही अस्त होत नाहीं.
सकलमतस्थापित
श्रीप्रभु हा सकल मतांमध्ये सर्वमान्य असून सर्व मतें त्याच्यापासून उगम पावून त्याच्यांतच लीन होतात.
श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराज की जय अशा श्री सद्गुरु माणिकप्रभु महाराजांचा जयजयकार असो.