माणिकनगर

माणिकनगरचे हवामान

कसे पोचावे

माणिकनगर हें एका छोट्या डोंगराची उशी करून पहुडलेले शांत सुनिर्मळ असे गांव आहे. गावाच्या उत्तरेला डोंगर असून पूर्वेला गुरुगंगा व विरजा ह्या दोन चिमुकल्या नद्यांचे पवित्र संगम आहे. श्रीप्रभु महाराजांचे समाधि मंदिर हें ह्या गावचे केंद्रबिंदु होय. कर्नाटकांतील बीदर जिल्ह्यांत हुमनाबाद हें तालुक्याचे ठिकाण असून तेथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर माणिकनगर वसले आहे. पुणे – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग व बीदर – बेंगळूर राज्य महामार्गाच्या ऐन चौकावर हुमनाबाद हें महत्त्वाचे बस स्थानक आहे. येथून गुलबर्गा 65 किलोमीटर, बीदर 50 किलोमीटर, पुणे 385 किलोमीटर, हैदराबाद 160 किलोमीटर व मुंबई 500 किलोमीटर अंतरावर आहेत. गुलबर्गा व बीदर हें जवळचे रेल्वे स्टेशन असून हैदराबाद हे जवळचे विमानतळ आहे.